भुसावळात मास्क न लावणार्‍यांवर धडक कारवाई

0

भुसावळ : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता प्रशासनाकडे विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. भुसावळातदेखील दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने गुरुवारपासून मास्क न लावणार्‍या नागरीकांसह वाहनधारकांवर 200 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात आहे. गुरुवारी शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने तब्बल 23 जणांवर कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.

पोलिसांकडूनही प्रभावी जनजागृती
शहर पोलिसांकडून त्यांच्या हद्दीत पोलिस गाडीवरील स्पिकरवरून सूचना देण्यात येत आहे की, कोरोनाच्या पा्र्श्वभुमीवर प्रत्येकाने तोंडाला मास्क लावा अन्यथा पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील,सोपान पाटील आणि अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी 23 जणांविरूध्द मास्क नसल्याने प्रत्येकी 200 रूपये नुसार दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दररोज केली जाणार असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वातही वाहतूक शाखा व नगरपालिका कर्मचार्‍यांनी संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Copy