Private Advt

भुसावळात महिलेस मारहाण करून लुटले ः आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : स्वस्तात टाईल्स देण्याच्या बहाण्याने महिलेस मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना शहरातील खडका चौफुलीवर 23 रोजी रात्री नऊ वाजता घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ डीबी पथकाने या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख चाँद शेख हमीद (35, रा.दीनदयाल नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल असून त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत.

बाजारपेठ पोलिसात दाखल होता गुन्हा
तक्रारदार रीषा मुनालाल गोयल (रा.ऑर्बीट अपार्टमेंट, वरणगाव रोड, भुसावळ) यांना 23 रोजी रात्री नऊ वाजता खडका चौफुलीवर संशयीत आरोपी शेख चाँद शेख हमीद याने स्वस्तात टाईल्स मिळवून देण्याच्या आमिषाने रीक्षामध्ये नेत मारहाण केली तसेच फिर्यादीच्या हातातील सोन्याच्या तीन अंगठ्या तसेच तीन हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी 24 रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचोरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखली सहा.निरीक्षक हरीष भोये, नाईक निलेश चौधरी, विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, बंटी कापडणे, आर.सी.पी.कर्मचारी अक्षय सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली. तपास उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.