भुसावळात महिलेला अश्‍लील शिवीगाळ करीत विनयभंग : आरोपीला अटक

0

भुसावळ : महिलेला अश्‍लील शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. जळगाव रोडवरील ताडीच्या मळ्याजवळ एक महिला स्कुटरवर जात असताना बाजूने जाणार्‍या विकास नावाच्या युवकाने तोंडाने मुका घेण्याचा आवाज काढला व याचा जाब महिलेने विचारल्यानंतर संशयीत आरोपीने अश्लील शिवीगाळ केली आणि महिलेवर हात उगारला मात्र यावेळी त्याला तेथे असलेल्या काही नागरिकांनी आवरले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री मोहित नगरातील विकास नावाच्या एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयीत विकास याला रात्रीच या प्रकरणी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुपडा पाटील तपास करीत आहेत.

Copy