भुसावळात मनाई असतानाही भाजीपाला लिलाव : तीन लाखांचा भाजीपाला जप्त

0

भुसावळ : शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला लिलाव व विक्रीस मनाई असताना शनिवारी सकाळी भाजीपाल्याचा लिलाव होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने धडक कारवाई करीत सुमारे तीन लाखांचा भाजीपाला जप्त करीत आडते-विक्रेत्यांची 17 वाहने जप्त करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, जप्त भाजीपाला हा रजिस्टर स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातूना गरजूंना देण्यात आला.

भल्या पहाटे सुरू होता लिलाव
शहराच्या आठवडे बाजारात मनाई आदेश असतानाही भाजीपाल्याचा लिलाव होत असल्याची मिळाल्यावरून प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरीषद, महसूल व पोलिस पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास धाव घेत लिलाव बंद पाडला. यावेळी पथकाने सुमारे पाच लाखांचा भाजीपाला जप्त करीत सुमारे 18 वाहने जप्त केली तसेच जप्त केलेला भाजीपाला कोरोनाच्या काळात गरीब व गरजु लोकांना जेवणाची सुविधा करणार्‍या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांना देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे व मुख्याधिकारी कल्पना डहाळे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासुन पालिकेने पथके स्थापन केली असून त्यांनी दंडात्मक कारवाई व काही गुन्हे दाखल केले होते मात्र या धडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यांवर आता अतिरिक्त पोलिस कुमक उतरवण्यात आली आहे. नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरातील सर्व वॉर्ड तसेच गल्ल्यांमध्ये जाऊन लाऊड स्पिकरद्वारे सकाळी 11 ते 3 या काळात फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच सुरू असल्याची व ठेवण्याची सूचना केली जात आहे.

Copy