Private Advt

भुसावळात मजुराची तापी नदीत आत्महत्या

भुसावळ : व्यावसायाने गवंडी असलेल्या मजुराने तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाळू बाबुलाल चव्हाण (45, श्रीराम नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. मजुराने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र हद्द फैजपूरची असल्याने त्यांना पोलिसांना माहिती कळवली मात्र तब्बल अडीच तासांनी फैजपूर पोलीस दाखल झाल्याने मृतदेह काढून नगरपालिका रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री आठ वाजेच्या दरम्यान ग्रामिण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, या प्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.