Private Advt

भुसावळात मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील 32 कॉलनी परीसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर 22 वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, 16 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहरातील 32 खोली भागातील पाण्याच्या टाकीजवळ बांधकाम सुरू असून या बांधकाम साईटवर शेगाव येथील मजुर कामाला आहे. या मजुरांपैकी विजय संतोष थोरात (22, रा.शेगाव, जि.बुलढाणा) याने गळफास घेत आत्महत्या केली. रविवार, 16 रोजी रात्री साडेनऊ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत इफ्तेखार अहमद समशेर खान (ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक निलेश चौधरी करीत आहे.