भुसावळात भाजी विक्रेत्यावर चाकूहल्ला

0

भुसावळ : भाजीपाला लिलावावरून वाद उद्भवल्याने एका भाजीपाला विक्रेत्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना रविवारी शहरातील आठवडे बाजार भागात घडली. या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भाजीपाला विक्रेते पवन मोहन चौधरी (30, श्रीराम नगर) यांच्या फिर्यादीनुसार रविवारी भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून संशयीत आरोपी धम्मा सुरळकर व रीतीक नरेंद्र चौधरी (पंचशील नगर) यांनी मांडीवर तसेच उजव्या हाताच्या दंडावर चाकू करून दुखापत केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बाविस्कर करीत आहेत.

Copy