भुसावळात भाजपा आमदार पडळकरांच्या प्रतिमेला चप्पल मारून राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी नोंदवला निषेध

0

गोपीचंद पडळकर दिसताच तोंडाला काळे फासणार : जि.प.सदस्य रवींद्र पाटील

भुसावळ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भुसावळ शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी निषेध नोंदवला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशासनाला पदाधिकार्‍यांनी निवेदन देत पडळकरांची आमदारकी रद्द करण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पडळकर माफी मागा अन्यथा तोंड काळे करणार : रवींद्र पाटील
भाजप नेत्यांची पुढेपुढे करून आमदारकी मिळवलेल्या गोपीचंद पडळकर याने आदरणीय शरद पवार साहेबांविषयी बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकणे आहे. गोपीचंद पडळकरांनी लवकरात लवकर आदरणीय शरद पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिथे भेटेल तिथे त्याचे तोंड काळे करण्यात येईल तसेच ते जेथे दिसतील तेथे राष्ट्रवादी युवकचे कार्येकर्ते चोप देणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी प्रसंगी दिला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रविंद्र नाना पाटील, कृषी बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, तालुकाअध्यक्ष दीपक मराठे, शहाध्यक्ष नितीन धांडे, न.पा.गटनेते दुर्गेश ठाकूर, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक शहराध्यक्ष रणजीत चावरीया, राहुल वाघ, भूपेंद्र तायडे, शाकिर पिंजारी, योगेश नरोटे, अमोल मांडे आदी उपस्थित होते.

Copy