भुसावळात भाजपाने स्वयंस्फूर्तीने पुकारलेला लॉकडाऊन सर्वपक्षीय नाही

0

भुसावळ : भुसावळ शहर 1 ते 3 मे दरम्यान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत भाजपाने घेतलेली भूमिका ही सर्वपक्षीय नाही त्यामुळे या काळात किराणा माल विक्रीसह दुध डेअरी तसेच भाजीपाला विक्री सुरूच राहणार असल्याची भूमिका माजी आमदार संतोष चौधरी यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, भाजपाने हा घेतलेला निर्णय असून प्रांताधिकारी व जिल्हाधिकार्‍यांचे याबाबत कुठलेही आदेश नाहीत.

भुसावळकरांना शासनाचे आदेश मान्य : संतोष चौधरी
शहरातील ज्या भागात कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत त्या भागात 14 दिवस लॉकडाऊन करण्यात आले असून शासनाने दिलेले प्रत्येक आदेश आम्हाला मान्य आहेत मात्र भाजपा पदाधिकार्‍यांना शहर बंद करण्याचा अधिकार नाही. भुसावळकरांची गैरसोय होवू नये म्हणून दुध डेअरी, किराणा माल दुकाने व भाजीपाला विक्री सुरू ठेवावी, असे आवाहनही माजी आमदार चौधरींनी केले आहे. ज्यांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळावयाचा आहे त्यांनी बंद पाळावा, त्याला विरोध नसल्याचेही चौधरी म्हणाले.

Copy