भुसावळात ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे भव्य शिवलींग दर्शन

0

भुसावळ ।येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 17 ते 21 मार्च दरम्यान 36 फुट उंच भव्य शिवलींग दर्शन आध्यात्मिक लेजर शो आयोजित करण्यात आला आहे. प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालय केंद्राच्या प्रमुख सींधूदिदी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 17 मार्चला सायंकाळी 5.30 वाजेला मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत 21 तारखेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात परमात्मा अनुभूती चलचित्र, लेजर शोद्वारे आध्यात्म मार्गदर्शन, नैतिक मुल्यावर आधारीत मनोरंजनात्मक खेळ, परमात्मा अवतरणाचे एलईडी चित्रे त्यात असणार आहे. हा कार्यक्रम मोफत असून शहरातील नागरीकांनी अधिकाधिक संख्येने या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.