भुसावळात बेवारस वाहनांच्या लिलावाहून साडेचार लाखांचे उत्पन्न

भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात बुधवारी सकाळी भुसावळ विभागातून जप्त करण्यात आलेल्या 110 बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला. याप्रसंगी चार लाख 22 हजार 500 रुपयांची सर्वाधिक बोली लावणार्‍या लिलाव धारकास भंगार वाहनांचा ताबा कायदेशीर प्रक्रियेअंती देण्यात आला.

जुन्या उपअधीक्षक कार्यालयात लिलाव
बाजारपेठ, शहर, तालुका व नशिराबाद पोलीस ठाण्यातल सुमारे 110 बेवारस वाहनांसाठी बुधवारी लिलाव प्रक्रिया पोलिसांनी आयोजीत केली होती. शहरासह विभागात बेवारस वाहने सापडल्यानंतर ती जप्त करण्यात आली होती शिवाय मालकी हक्काबाबत वाहनधारकांना आवाहनही करण्यात आले मात्र मूळ मालक समोर न आल्याने व वर्षानुवर्षे ही वाहने पडून जीर्ण व भंगार झाल्याने त्यांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार, नशिराबादचे सहा.निरीक्षक गणेश चव्हाण उपस्थित होते.