भुसावळात बेकायदेशीर देशी दारूची विक्री : एकास अटक

0

भुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील रमाबाई आंबेडकर नगर भागात बेकायदेशीर देशी दारुची विक्री होत असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्यानंतर रविवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास छापा टाकून श्रावण रमेश देवरे (33, रा.रमाबाई आंबेडकर) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 872 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या 36 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, एएसआय तस्लीम पठाण, पोलिस नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तुषार पाटील, महेश चौधरी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.