भुसावळात बेकायदा दारू विक्री : एकाला अटक

भुसावळ :  विना परवाना देशी दारूची विक्री करताना शहर पोलिसांनी एकाला अटक केली. शिशुपाल मिलिंद पवार (25, समता नगर, भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत संशयीत बुधवारी विना परवाना देशी दारूची विक्री करीत असताना पोलिसांनी कारवाई करीत संशयीताकडील 600 रुपये किंमतीच्या दहा टँगो पंचच्या बाटल्या जप्त केल्या. भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सैय्यद, नाईक विकास बाविस्कर, नाईक जाकीर मन्सुरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Copy