भुसावळात बेकायदा दारू विक्री : आरोपीस अटक

0

भुसावळ : शहरातील शिवाजी नगर भागातील महादेव मंदिराच्या बाजूला आरोपी विक्रांत उर्फ विक्की गणेश देवपुजे (28, रा.शिवाजी नगर, भुसावळ) हा बेकायदा दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत आरोपीच्या ताब्यातून 364 रुपये किंमतीच्या टँगो पंच कंपनीच्या सात बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तुषार पाटील, महेश चौधरी, समाधान पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.

Copy