भुसावळात बेकायदा दारूची वाहतूक : एकास अटक

0

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी भागात बेकायदा देशी दारूची वाहतूक करणार्‍या गोवर्धन सुधाकर तारवाणी (37, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यास 2 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, हवालदार युवराज नागरुत, कृष्णा देशमुख, सुनील थोरात, दीपक जाधव, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, सचिन चौधरी, योगेश माळी, विनोद वितकर आदींनी ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 144 रुपये किंमतीच्या देशी टँगा कंपनीच्या 22 बाटल्या जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक सुनील थोरात करीत आहेत.