भुसावळात बाजारपेठ पोलिसांनी अडीच लाखांचा मद्याचा साठा केला जप्त

0

भुसावळ : महार्गावरील एका गोडाऊनमध्ये अवैध दारूचा साठा असल्याची पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने अचानक छापा टाकून गोडाऊनमधून दोन लाख 35 हजार रूपये कींमतीचा विदेशी दारूचा साठा पकडला. यामुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. डीवायएसपी गजानन राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना माहिती देत अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्याच्या सूचना केल्यात. मिळालेल्या माहितीची खात्री करून गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक भागवत, सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, युवराज नागरूत, रमण सुरळकर, माणिक सपकाळे, वाल्मीक सोनवणे, राज्य उत्पादन विभागाचे कल्याण मुळे, नंदू पवार यांनी मिळालेल्या माहितीनंतर अचानक छापा टाकला असता महामार्गावरील एका पत्र्याचे शेड असलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी वरिष्ठांना माहिती देत घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी देशी दारूचा एक खोका, बिअरचा एक खोका आणि विदेशी मद्याचा साठा असा सुमारे 2 लाख 35 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व माल पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणला.

Copy