Private Advt

भुसावळात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

11 लाखांचा मुद्देमाल जप्त : कोटींग प्लाँटमध्ये सुरू होता कारखाना

भुसावळ : शहरातील शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील कोटींग व फर्निचर प्लाँटमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी उद्ध्वस्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पथकाने कारखान्यातून 350 टँगो पंच देशी दारूचे खोके, तीन ड्रम स्पीरीट, दारू सील करण्यासाठी लागणारे मशीन, रीकामे बुच, बाटल्या आदी मिळून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भुसावळातील रवी ढगे यांच्या मालकिचे हे गोदाम असल्याचे सांगण्यात आले.