भुसावळात बंद घर फोडले : 18 हजारांचा ऐवज लंपास

भुसावळ : शहरातील हनुमान नगर भागातील बंद घर फोडत चोरट्यांनी 18 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण बाळकृष्ण वारके (33, हनुमान नगर, भुसावळ) हे मार्केटींग व्यवसाय करतात. त्यांच्या शेजारी काका अशोक नामदेव वारके हे राहतात. 20 ऑक्टोबर रोजी ते मुलाला भेटण्यासाठी पुण्यात गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 27 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास वारके यांना जाग आल्यानंतर त्यांना काका अशोक वारके यांच्या घराजवळ एक संशयीत इसम उभा असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धाव घेतल्यानंतर संशयीत इसम पसार झाला तर घराची पाहणी केली असता दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटल्याचे दिसल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त दिसून आला. चोरट्यांनी स्टीलच्या पेट्यांमध्ये ठेवलेली 17 हजारांची रोकड व एक हजार रुपये किंमतीचे चांदीचे नाणे लांबवल्याने या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात भूषण वारके यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पाटील करीत आहेत.

Copy