Private Advt

भुसावळात प्लॅटला आग ; व्यापार्‍याचा मृत्यू : मुलगा होरपळला

भुसावळ : शहरातील महेश नगरातील निकुंज अपार्टमेंटमधील एका प्लॅटला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने त्यात होरपळून 60 वर्षीय व्यापार्‍याचा मृत्यू ओढवला तर पित्याला वाचवण्यासाठी सरसावलेला मुलगाही आगीत होरपळला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आगीच्या घटनेनंतर रहिवाशांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला तर अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेत केशवलाल मोरंदमल वाधवानी (60) यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा लखन वाधवानी हा होरपळला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

शॉर्ट सर्किटमुळे आगीचा संशय
व्यापारी केशवलाल मोरंदमल वाधवानी (60) हे पत्नी व मुलांसह महेश नगरातील निकुंज अपार्टमेंटमधील तिसर्‍या मजल्यावर राहतात. मध्यरात्रीच्या सुमारास प्लॅटला अचानक आग लागल्यानंतर धुरामुळे लखन वाधवानी यांना जाग आली व त्यांनी लहान भाऊ जतीन, आई माया वाधवानी यांना उठवले. यावेळी आगीचे तांडव वडील केशवलाल यांच्या बेडरूमध्येच सुरू असल्याने त्यांना वाचवण्यासाठी मुलगा लखन गेला असता वडील हे बेडरूममधील बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळले तर वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला लखन हा देखील आगीत होरपळला.