भुसावळात पोलिस उपअधीक्षकांसह पालिकेच्या कारवाईने उडाली खळबळ

भुसावळात दोन तर कुर्‍हे येथे एक बाधीत आढळला : विनाकारण भटकणार्‍यांना ‘अ‍ॅन्टीजन सरप्राईज’

भुसावळ : कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्यानंतरही नागरीक नियमांचे पालन करीत नसल्याने शिवाय विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा स्प्रेड होत असल्याने कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून 13 एप्रिलपासून रस्त्यावर येणार्‍यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जात आहे. शनिवारीदेखील शहरात 44 नागरीकांची अ‍ॅन्टीजन केल्यानंतर त्यात दोन बाधीत आढले. तालुक्यातील कुर्‍हा येथे 40 पैकी एक महिला बाधीत आढळली साकेगाव 30 ग्रामस्थांच्या चाचणीत एकही बाधीत आढळले नाही. दरम्यान, संचारबंदीचे उल्लघंण करणार्‍या 361 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत एक लाख सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अधिकारी उतरले रस्त्यावर
शनिवारी शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार दीपक धीवरे, पालिकेचे उपमुख्याधिकारी महेद्र कातोरे यांनी रस्त्यावर थांबून रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांना थाबवून त्यांची तपासणी केली. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी हे रस्त्यावर होते, त्यांनी प्रवासी भरून आलेली बाहेरगावची रीक्षाही थांबवून त्यातील प्रवाशांची कोरोना टेस्ट केली. रस्त्याने येणारे जाणारे मोटर सायकलस्वार, कारमधील लोकांची टेस्ट करण्या आली. सकाळी 11.30 ते 12.30 तासभर अधिकारी तेथे थांबून होते, त्यांनी तासभरात 45 जणांची तपासणी केली.

अचानक होतेय तपासणी
पालिक व पोलिस प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्य ठिीकाणी स्वॅब तपासणीचे आयोजन केले जाणार आहे शिवाय अ‍ॅन्टीजन तपासणी शिबिर यापुढे शहरातील विविध भागात राबवून विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर चाप लावणार्‍यांसाठी सुरू राहणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. विनाकारण नागरीक शुल्लक कारणावरून घराच्या बाहेर पडत असून कोरोना स्प्रेड टाळण्यासाठी तसेच कटू कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपअधीक्षकांनी केले.