भुसावळात पोलिसांवर दगडफेक : एका आरोपीला अटक

0

भुसावळ : पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. शकील उर्फ मोहंमद जलील (रा. शिवाजी नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जानेवारी महिन्यात भुसावळ बंदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर हिंसक जमावाने दगडफेक केल्यानंतर गुन्हा दाखल होवून  15 संशयीतांना अटक करण्यात आली होती तर या गुन्ह्यात 185 जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्यात संशयीत शकील उर्फ मोहंमद जलील (रा. शिवाजी नगर, भुसावळ) हा जाम मोहल्ला परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. आरोपीस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Copy