भुसावळात पालकमंत्र्यांचा ताफा अडवत भारीपाने दाखवले काळे झेंडे

0

सुरक्षा रक्षकांची उडाली तारांबळ : आंदोलक कार्यकर्ते शहर पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ- फैजपूर येथील कृषी शिबिरासाठी जात असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळातील भारीपा कार्यकर्त्यांनी अडवत त्यांना काळे झेंडे दाखवल्याने सुरक्षा यंत्रणांची शहरात चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्याला पूर्णवेळ पालकमंत्री नसल्याने व चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. या प्रकारानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले तर शहर पोलिसांनी दहा ते 15 आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. भारीपा बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, दिनेश इखारे, संजय सुरडकर आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.