भुसावळात पशूवैद्यकीय दवाखान्यातून रजिस्टर्स लांबवले

0

भुसावळ- शहरातील यावल रोडवरील पशूवैद्यकीय दवाखान्याचे गज कापून चोरट्यांनी आत प्रवेश करीत कपाटातील सामान अस्ताव्यस्त करीत 19 रजिस्टर्स लांबवल्याची घटना 4 ते 5 ऑक्टोबरदरम्यान घडली. या प्रकरणी पशूधन विकास अधिकारी डॉ.सलीम बशीर तडवी यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 4 रोजी सायंकाळी दवाखाना बंद केल्यानंतर 5 रोजी सकाळी तो उघडला असता दवाखान्याच्या खिडकीचे गज कापलेले आढळल्यानंतर शहर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी धाव घेतली. तपास हवालदार साहिल तडवी करीत आहेत.