भुसावळात पथक हटताच दुकाने सुरू

नगरपालिका पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवण्याची गरज

भुसावळ : कोरोना स्प्रेड रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन वाढवले असलेतरी काही व्यापार्‍यांकडून मात्र पहाटे वेळी नॉन इसेन्शीयील दुकाने खुली करून व्यवसाय केला जात आहे शिवाय पोलिस व नगरपालिका प्रशासनाची गाडी येतात शटर बंद केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्यापारीपेठेत सुरू असल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. पालिका व पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असलीतरी व्यापारी मात्र जुमानत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, कोरोनाचे नियम मोडणार्‍या शहरातील तीन दुकानदारांसह नो मास्क, डिस्टंन्सींचे नियम मोडणे आदी प्रकरणात पोलिस व पालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. पथकाने सोमवारी 22 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला.

दंडात्मक कारवाईनंतरही व्यापारी ऐकेना
शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्व. छबीलदास चौधरी व्यापारी संकूलातील शिव प्रोव्हीजन या किराणा दुकानात ग्राहकांची प्रचंड गर्दी होवून फिजीकल डिस्टंन्सींगचे नियम पाळले न गेल्याने व याच भागातील श्रीहरी ट्रेडर्स व श्री गणेश ट्रेडर्स येथेही गर्दी आढळून आली व फिजीकल डिस्टंन्सींग, मास्कचा वापर टाळणे तसेच सॅनीटायझेशन होत नसल्याचे दिसून आल्याने या तिन्ही दुकानदारांवर प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. यासोबतच सोशल डिस्टंन्सींगचा गैरवापर केल्या प्रकरणी लग्न व विविध गर्दीच्या कार्यक्रमांतून आठ हजार रुपये, इतर विविध दुकानदारांकडून साडेतीन हजार रुपये, नो मास्कच्या 35 प्रकरणांतून 7 हजार 700 रुपये असा एकूण 22 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पालिकेच्या कारवाईवर प्रश्‍नचिन्ह !
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, नगरपालिकेचे लेखापाल संजय बाणाईते, लेखापाल विशाल पाटील, लिपीक राजू चौधरी, किरण मंदवाडे, किशोर जंगले यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील केवळ 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र यासोबतच कपडा, स्टेशनरी, गॅरेज, इलेक्ट्रॉनिक्स, फुटवेअर, रेडीमेड, जनरल स्टोअर्स आदी सर्वच दुकाने सुरु ठेवले जात आहेत. आता तर रस्त्यावरही हातगाड्यांवरुन रेडीमेड कापडे विक्री होत आहे. या विक्रेत्यांवर पालिका प्रशासन कारवाई का करीत नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.