भुसावळात पत्रकार व पोलिसांची आरोग्य तपासणी

0

भुसावळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिका आरोग्य विभाग आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात बाजारपेठ, शहर पोलिस ठाणे आणि तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांची तसेच पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीचा सुमारे 142 जणांनी लाभ घेतला. शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी 10 वाजता शहरातील तिन्ही पोलिस ठाणे आणि शहर वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचार्‍यांच्या आरोग्याची तपासणी पालिकेचा आरोग्य विभाग आणि आयएमएच्या माध्यमातून करण्यात आली. डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक वैभव पेठकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ.विजय सोनी, डॉ.विरेद्र झांबरे, डॉ.अभय फलटणकर, डॉ.जयंत धांडे, डॉ.सूर्यभान पाटील, प्रशांत देवरे, प्रवीण नायसे आदी उपस्थित होते.

Copy