भुसावळात नियमांचे उल्लंघण : तीन दुकानांकडून आठ हजारांचा दंड वसुल

भुसावळ : लॉकडाऊनचे आदेश असताना नियम डावलून दुकाने उघडणार्‍या दुकानदारांविरुद्ध पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. सोमवारी एका दुकानदाराकडून पाच हजार तर मंगळवारी पुन्हा दोन दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यात एकूण आठ हजारांचा दंड वसुल करण्यात आला. सोमवारी जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजसमोरील जगदीश ऑटो पार्ट या दुकानदाराकडून पालिका प्रशासनाने पाच हजार रुपये दंड वसूल केला तर मंगळवारीदेखील शहर हद्दीतील दोन दुकानदारांकडून दंड वसुल करण्यात आला. त्यात दोन व एक हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

दुकानदाराने घातली हुज्जत
 तीन दुकानांकडून आठ हजारांचा दंड वसुलसोमवारी जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजसमोरील जगदीश ऑटो पार्ट या दुकानदाराविरुद्ध कारवाई करताना पालिका व पोलीस प्रशासन गेल्यानंतर दुकानदाराने काही वेळ हुज्जत घातली मात्र पथकाने पाच हजारांचा दंड वसुल केला तर मंगळवारी देखील शहर हद्दीतील दोन दुकानदारांकडून तीन हजारांचा दंड वसुल करण्यात आला. पालिकेचे वरीष्ठ लेखाधिकारी संजय बाणाईते, किशोर जंगले, विशाल पाटील, सुनील शेकाकारे व शहर पोलिस ठाण्याचे
निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

Copy