भुसावळात नायब तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या दोघा संशयीतांना न्यायालयीन कोठडी

भुसावळ : पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने दोघांनी भुसावळ तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना शिवीगाळ करीत अरेरावीची भाषा वापरल्याचा प्रकार बुधवारी दुपारी चार वाजता घडला होता. या प्रकरणी इंगळे यांच्या तक्रारीवरून पप्पू सुरळकर व लक्ष्मण जाधव यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली. संशयीत आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व नंतर त्यांच्या सबजेलला रवानगी करण्यात आली. दोघा संशयीत आरोपींनी संजय गांधी योजना कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एस.जे.इंगळे यांना पुरवठा विभागातील 12 अंकी क्रमांक मिळत नसल्याने वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

Copy