Private Advt

भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले

भुसावळ शहरातील कस्तुरी नगरातील भर दिवसा घडलेली घटना : पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध

भुसावळ : शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा तपास लागत नसतानाच पुन्हा शहरातील कस्तुरीनगरात घराबाहेर शतपावली करणार्‍या 55 वर्षीय महिलेच्या गळ्यातून 70 हजार रुपये किंमतीचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याची घटना उघडकीस आल्याने महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहिता योगिता अनिल दीक्षित (55, मुक्तानंद कॉलनी, कस्तुरी नगर) या मंगळवार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घराबाहेर पायी फिरत असताना दुचाकीवर आलेल्या एकाने काही कळण्यात महिलेच्या गळ्यातून अडीच तोळे वजनाची व 70 हजार रुपये किंमतीचे मंगलपोत हिसकावून पोबारा केला.