भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले

नारायण नगरातील भर दिवसा घडलेली घटना : सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा पोलिसांकडून कसून शोध

 

 

भुसावळ : शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याच्या घटनांमुळे वाढ झाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त हेत आहे. गुरुवादीदेखील भर दुपारी 12 वाजेच्या सुमारास लग्नासाठी सुरत येथून भुसावळात आलेल्या महिलेचे 9 नऊ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी नारायण नगरातून लांबवले. या घटनेने शहरातील महिलावर्गात मोठी घबराट पसरली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध
सुरत येथील महिला मालतीबाई सोनू कोष्टी या त्यांच्या नातेवाईकांकडे लग्नासाठी आल्या होत्या. त्या घराबाहेर पडताच धूम स्टाईल दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांचे मंगळसूत्र लांबवले. काही कळण्याआत चोरटे पसार झाले. शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, साहील तडवी हे त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरा असलातरी सकाळी लाईट गेल्याने फुटेज मिळू शकले नाही. शहर पोलिसांनी परीसरातील आठ सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. शहरात महिलांच्या गळ्यातील पोत लांबविण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Copy