भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले ; टोळी सक्रिय, महिलांमध्ये भीती

0

भुसावळ- धूम स्टाईल चोरट्यांचा बंदोबस्त पोलिस प्रशासनाने केल्यानंतर पुन्हा टोळी सक्रिय झाली असून शांती नगराजवळील पत्री शाळेजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 95 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवल्याची घटना 22 रोजी रात्री 10.30 वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रंजना सुधाकर चौधरी (शारदा नगर, भुसावळ) या 22 रोजी रात्री 10.30 वाजता पत्री शाळेजवळून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाचे व 95 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. चोरट्यांनी अंगात काळा टी शर्ट परीधान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरडा-ओरड करण्यापूर्वीच चोरटे धूम स्टाईल पसार झाले होते. शहर पोलिसांनी माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जावरे करीत आहेत.

Copy