Private Advt

भुसावळात दोन ट्रकचे टायर लांबवले

भुसावळ : शहरात चोरट्यांनी उभ्या असलेल्या ट्रकचे टायर्स लांबवल्याने ट्रक चालकांमध्ये भीती पसरली आहे. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील सीटी हॉस्पीटलसमोर सोमवार, 14 रोजी रात्री 10 वाजता ट्रक (पी.बी.12 टी.7334) व ट्रक (पी.बी.12 टी.7339) या उभ्या असताना चोरट्यांनी दोन्ही ट्रकचे पाच टायर्स लांबवले. यामुळेट्रक चालकांचे 75 हजारांचे नुकसान झाले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अरविंदसिंग ऋषी नारायणसिंग (रा. सुंदर नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदेश निकम, तेजस पारीस्कर करीत आहेत.