भुसावळात दुचाकी अपघातात रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

0

भुसावळ : इलेक्ट्रिक पोलवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात रेल्वेच्या सीएनडब्ल्यू विभागातील कर्मचारी राकेश प्रकाश विसे (42) यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर रेल्वे कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली.

जागेवरच झाला मृत्यू
रेल्वेच्या सी.एन.डब्ल्यू विभागात नोकरीस असलेले राकेश विसे (42, हनुमान नगर, भुसावळ) हे सोमवारी रात्री ते कामावरून घरी जात असताना लाल चर्च ते डीआरएम कार्यालय चौक यादरम्यान त्यांची दुचाकी इलेक्ट्रिक खांबावर आदळल्यानंतर ते जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी नागरीकांनी त्यांना रेल्वे रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार संजय पाटील, सोपान पाटील, विशाल मोहे हे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

Copy