भुसावळात दिड लाखांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात

भुसावळ : दुकानाचे शटर वाकवून दुकानाच्या ड्रावरमधील सुमारे दिड लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात 14 रोजी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. कृष्णा पन्नालाल धोबी (26, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव रोड जुना सातारा मरीमाता मंदिराजवळील राहत्या घराच्या खालच्या मजल्यावर असलेल्या ज्ञानदीप सुपर शॉपीचे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून काउंटरमधील दीड लाखांची रोकड चोरट्याने लांबवली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री घडली होती. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्याची छबी कैद झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे, सचिन चाटे, इसराइल खाटीक यांनी आरोपीला अटक केली.