भुसावळात दावत-ए- इस्लामी हिंद तर्फे रोख रक्कम व धान्याचे वाटप

0

भुसावळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू असून दररोज कमावणारे व खाणार्‍या कुटुंबांना खूप त्रास होत आहे. अशा कुटुंबांसाठी दावत-ए- इस्लामी हिंद संपूर्ण भारतात कोरोनाव्हायरस वेल्फेअर मोहीम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत गरीब गरजू निराधार कुटुंबांना एक हजार 200 रुपये रोख व धान्य वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत भुसावळमध्येही अशा 40 कुटुंबांना मंगळवार, 14 एप्रिल रोजी प्रत्येकी एक हजार 200 रुपये रोख रक्कम व 150 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात भुसावळ शहर प्रमुख इम्रान अत्तारी, हाजी तन्वीर, रफिक कादरी, युसूफखान, सैय्यद साबीर, हाजी शाकीर, सईद अत्तारी, रफिक रोशन यांनी परीश्रम घेतले.

Copy