Private Advt

भुसावळात तीन बंदुकींसह चार तलवारी जप्त

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची गोपनीय माहितीवरून धडक कारवाई : संशयीत पिता-पूत्र पसार

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील दोन संशयीतांकडे घातक शस्त्र असल्याची माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी धडक कारवाई करीत दोन संशयीतांच्या घरातून चार तलवारी, चार चाकूंसह तीन शिकारीच्या बंदूक जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेख पप्पू अब्बास शेख उर्फ शिकारी व त्याचा मुलगा रीजवान पप्पू शेख (दोन्ही रा.खडका रोड, नवीन ईदगाहसमोर, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून संशयीत पसार झाले आहेत.

घातक शस्त्रसाठा जप्त
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 58 संशयीतांच्या घरांची झडती घेण्यासंदर्भात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडून पोलिसांनी परवानगी घेतली होती. त्यानुषंगाने बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या दरम्यान संशयीत आरोपी शेख पप्पू अब्बास शेख यांच्या खडका रोडवरील घरातून चार लोखंडी तलवारी तसेच चार चाकू व एक रायफल, एक बंदुक व एक शिकारीची बंदुक मिळून एकून चार हजार रुपये किंमतीचा शस्त्र साठा जप्त केला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार दोघा पिता-पूत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, हवालदार जयराम खोडपे, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्‍हाडे, कृष्णा देशमुख, परेश बिर्‍हाडे, मीना कोळी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहेत.