भुसावळात तापीपात्रातून पाच टन निर्माल्याचे संकलन

0

भुसावळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला समर्पित ‘एक दिवस लाडक्या बाप्पासाठी’ उपक्रमांतर्गत संस्कृती फाउंडेशनच्या माध्यमातून तापी काठावर राहुल नगर व अकलुद शिवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात तापी नदीपात्रातील अविसर्जीत गणेशमूर्ती मुख्य प्रवाहात विसर्जित करण्यात आल्या. निर्माल्य वगळता सुमारे पाच टन प्लास्टिक पिशव्या, केरकचरा, काच, थर्माकोल संकलित करून विल्हेवाट लावण्यात आली. संस्थेचे यंदा चौथे वर्ष असून स्वच्छतेच्या कार्यात जडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांना ‘स्वच्छता ही सेवा’ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

यांचा मोहिमेत सहभाग
संस्थेचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, शुभम तायडे, संस्कार मालविया, यामिनी महाजन, अश्फाक तडवी, अजय पाटील, सावन चौहान, प्रियंका परशकर, मनोहर झांबरे, गायत्री पाटील, अजित गायकवाड, जोस्तना झारखंडे, चेतन गायकवाड, सीमा आढळकर, वैष्णवी सरोदे, गीतिका कोरी, हर्षल येवले, हर्षवर्धन बाविस्कर, राहुल चौधरी, पराग चौधरी, विनीत बर्‍हाटे, शैलेंद्र महाजन, अशोक चौधरी, आकाश धनगर इत्यादींचा या मोहिमेत सहभाग होता.

Copy