Private Advt

भुसावळात तलवार बाळगणारा संशयीत बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : शहरातील मिल्लत नगर भागातील सिकंदर आबीद पिंजारी (18) या तरुणाकडे तलवार असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता कारवाई करीत संशयीतास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघण ांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, नाईक रमण सुरळकर, नाईक उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, ईश्वर भालेराव, परेश बिराडे, प्रशांत सोनार आदींनी केली.