भुसावळात तलवारीसह चाकू बाळगणार्‍यास अटक

0

भुसावळ : शहरातील गौसिया नगर भागातील लकी किराणा जवळील रहिवासी जमील ऊर्फ (राजा) तस्लीम शेख (23) याच्याकडे तलवार व चाकूसारखे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री नऊ वाजता कारवाई करीत आरोपीच्या घरातून दोन तलवार व दोन चाकू जप्त केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे, वैशाली सोनवणे आदींनी केली.

तलवारीसह चाकू जप्त
आरोपीच्या घरातील लोखंडी पलंगाखालून पोलिसांनी 900 रुपये किंमतीच्या दोन तलवारी व चाकू जप्त केले. कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक किशोर महाजन करीत आहेत.

Copy