Private Advt

भुसावळात ‘ड्राय डे’ ला उघड्यावर मद्यपान : 28 जणांवर कारवाई

भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी ड्राय डे असतानाही शहरातील सार्वजनिक जागांवर मद्यपान करणार्‍या तब्बल 28 जणांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत मद्यपींची झिंग उतरवली. शनिवारी सायंकाळी साडेसात ते साडेनऊ दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी शहरातील सर्व मोकळी मैदाने तीन टीमच्या माध्यमाने तपासत सार्वजनिक जागी मद्यपान करणार्‍या तब्बल 28 जणांना ताब्यात घेण्यात आले. संशयीताना बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110 व 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे 13 वाहनांवर मोटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात आली.

यांच्या पथकाने केली मद्यपींवर कारवाई
सोमवारी या सर्वांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. ही कारवाई
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक नाईक व सहकार्‍यांनी केली. या कारवाईमुळे मद्यपींच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.