भुसावळात डॉक्टरांकडे घरफोडी : दहा लाखांची रोकड लांबवली

2

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील रहिवासी असलेल्या डॉक्टर कुटुंबियांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 10 लाख 30 हजारांच्या रोकडसह 60 हजार रुपये किंमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. 24 मे ते 1 जून दरम्यान ही धाडसी घरफोडी झाली. या प्रकरणी शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध डॉक्टरांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

धाडसी घरफोडीमुळे खळबळ
रजा नगर, खडका रोड भागात डॉक्टर दाम्पत्य राहते. या दाम्पत्याचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख रक्कमेसह दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करीत कपाटातून किंमती मुद्देमाल लांबवला. घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक समाधान पाटील करीत आहेत.

Copy