Private Advt

भुसावळात ट्रॅक्टरच्या धडकेत गेट कोसळल्याने चिमुकला जखमी : एकाला अटक

भुसावळ : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने लक्ष्मी नगरातील सार्वजनिक वाचनालयाच्या गेटला जोरदार धडक दिल्याने हे गेट बाजूलाच खेळणार्‍या दहा वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडल्याने चिमुकला जखमी झाला. सोमवार, 23 रोजी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात अवैधरीत्या चोरीची वाळू वाहतूक केल्याप्रकरणी तसेच अन्य कलमान्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आली. आरोपी चालकास अटक करण्यात आली. पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी योगेश गोविंदा पाटील (26, गोंभी, ता.भुसावळ) याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (एम.एच.19 बी.जी.8477) ची जोरदार धडक लक्ष्मी नगर भागातील सार्वजनिक वाचनालयाच्या गेटला दिल्यानंतर गेट दहा वर्षीय बालक धु्रव गोपाळ बारी या चिमुरड्याच्या अंगावर कोसळल्याने तो जखमी झाला. योगेश पाटील याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने तसेच अपघात प्रकरणी त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. तपास नाईक रमण सुरळकर व प्रशांत परदेशी करीत आहेत.