भुसावळात जुन्या भांडणाचा उफाळला : दोघांवर तलवार हल्ला

हंबर्डीकर चाळ परीसरातील घटना : दोघा आरोपींना अटक

भुसावळ : जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील हंबर्डीकर चाळ परीसरात दोघांवर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवार, 19 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वरद राजीव जाधव (18, रा.मामाजी टॉकीज, हंबर्डीकर चौक, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी जितू कवडे व आकाश लोणारी (भारत नगर, भुसावळ) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तलवारीने हल्ला केल्याने वरदसह त्याचा मित्र गणेश भालेराव जखमी झाला. वरदच्या पाठीवर व उजव्या हाताच्या बोटावर तलवार लागली तर गणेशच्या डाव्या हाताच्या करंगळीवर तलवार लागल्याने गंभीर दुखापत झाली. दोघा आरोपींना कॉन्स्टेबल जाकीर मन्सुरी व सहकार्‍यांनी अटक केली. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास हवालदार इक्बाल सैय्यद करीत आहेत.