भुसावळात जय गणेश फाउंडेशन व रोटरीच्या शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान

0

भुसावळ : देशभरात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात रक्त पुरवठ्याचा तुटवडा भासत असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 15 एप्रिल रोजी संतोषी माता बहुउद्देशीय सभागृहात शिबिर झाले. सोशल डिस्टन्सचे नियम पाळत झालेल्या शिबिरात 55 दात्यांनी रक्तदान केले.

यांची होती उपस्थिती
रक्तपेढ्यांमध्ये रक्त बॅगचा तुटवडा होऊ नये यासाठी येथील जय गणेश फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रॉयल्सच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 ते 2 दरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व दवाखान्यातील रक्त पेढीचे डॉ.नितीन भारंबे, डॉ.विजयकुमार वानखेडे, डॉ.एस.एम.शेख, डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ.राजेश वारके, डॉ.राज तनवार यांनी रक्तदात्यांची तपासणी करून नाव नोंदणी केली तसेच शिबिरात रक्तदान करणार्‍या सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सचिव राजेंद्र यावलकर, जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर, गणेश फेगडे, प्रकल्प प्रमुख सरफराज तडवी, तुषार झांबरे, विरेंद्र पाटील, सी.जी.पवार, रवींद्र पाटील, खेमचंद भंगाळे, राहुल बावस्कर, नचिकेत यावलकर यांनी परीश्रम घेतले.

Copy