Private Advt

भुसावळात चोरीच्या प्रयत्नातील संशयीत निघाला मनोरुग्ण

भुसावळ : शहरातील प्रल्हाद नगर भागात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्र्यंबक उंबरकर यांच्या घराची भिंतीवरुन उडी मारून घरात प्रवेश करणार्‍या एका चोरट्याला उंबरकर यांचा मुलगा जय उंबरकर व परीसरातील नागरीकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र पकडण्यात आलेला संशयीत मानसिक रुग्ण निघाल्याने त्यास सोडून देण्यात आले.

मानसिक रुग्ण असल्याने सोडले
सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास प्रल्हाद नगर भागात त्र्यंबक उंबरकर यांच्या घराच्या भिंतीवरून एका चोरट्याने उडी मारली. यावेळी घरमालक उंबरकर यांचा मुलगा जय याला आवाज आल्याने तो उठून बाहेर आला असता, त्याला एक संशयीत आढळून आला. त्याने संशयीत चोरट्यावर झडप घालून पकडले आणि आरडाओरड करताच परीसरातील नागरीकही जमा झाले. त्यांनी चोरट्यास पकडून त्याची चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची माहिती दिली. नागरीकांनी बाजारपेठ पोलिसांना संपर्क साधून संशयीत चोरट्यास पोलिसांच्या हवाली केले मात्र पोलिसांनी चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे जाणवल्याने त्याला सोडून देण्यात आले.