भुसावळात चोरीचा प्रयत्न फसला : चोरटे झाले पसार

0

भुसावळ : शहरातील गोदावरी नगरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना रहिवाशांना आलेल्या जागेमुळे आल्या पावली परतावे लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. झाले असले की, शुक्रवारी रात्री 3.30 वाजता प्रा.डॉ.संजय चौधरी यांच्या घरी चार ते पाच चोरटे शिरले मात्र त्याचवेळी कुत्र्यांनी भुंकणे सुरू केल्यानंतर शेजारी बोठे यांनाही जाग आली व त्यांनी कुत्र्यांना हटकले तर चौधरी परीवाराने लाईट लावल्यानंतर दोन ते तीन चोरट्यांनी कम्पाऊंडमधून धूम ठोकली व चोरी केलेली इन्व्हर्टर बॅटरी रस्त्यावर फेकली. घटनास्थळी तीन मोठ्या प्लास्टिकच्या बॅग आढळल्या आहेत. संजीव बोठे, निलेश नेहेते, प्रा.संजय चौधरी व उमेश लासुरे यांनी नारायण नगर, भिरुड कॉलनी स्वामीविहार परीसरात चोरट्यांचा शोध घेतला मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. या भागात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Copy