भुसावळात चाकूहल्ला : माजी नगरसेवक संतोष बारसेसह चौघांविरोधात गुन्हा

Bhusawal Knife Attack Case : Case Against Former Corporator Santosh Barse, Mukesh Bhalerao And Four Others भुसावळ :  भुसावळातील झालेल्या चाकूहल्ला प्रकरणी तब्बल तीन दिवसानंतर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर रविवार, 31 जुलै रोजी रात्री आठ वाजता अजयसिंग उर्फ पापाराव रायसिंग पंडीत या तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपींमध्ये माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे, मुकेश भालेरावसह चार जणांचा समावेश आहे.

असे आहे नेमके प्रकरण
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार अजयसिंग याचा मित्र पासी याचे हर्षल राणेकडे फर्निचरचे 30 हजार रुपये घेणे होते. अजय याची हर्षलशी ओळख असल्याने पाशी याने अजयसिंगला हर्षलला पैश्याबाबत बोलण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी हर्षल राणे याने चाकूने अजयसिंगच्या उजव्या पाठीवर वार केले तर मुकेश भालेराव याने त्याच्या हातातील पिस्तूल उलट्या बाजूने बटन डोक्यात मारले शिवाय भरत याने दगडाने व लाथा बुक्यांनी मारहाण केली तर माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी यापूर्वी जीवे ठार मारण्याची अगोदरच धमकी दिल्याने व त्यांच्या सांगण्यावरून चाकूहल्ल्ल्याची घटना घडल्याने चौघांविरोधात अजयसिंग पंडीत यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पघडण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहे.