भुसावळात चाकूच्या धाकावर दहशत : एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : चाकूच्या धाकावर दहशत निर्माण केल्याप्रकरणी हितेश चंद्रकांत अनपल (20, रा.शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) याच्या विरूध्द भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी हितेश हा गुरूवारी सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास पंधरा बंगला भागात चाकू घेवून फिरताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी प्रशांत परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने चाकू जप्त केला असून आरोपीला अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर महाजन करीत आहेत.

Copy