Private Advt

भुसावळात घर उघडे असल्याची संधी साधत 70 हजारांचा ऐवज लांबवला

भुसावळ : भुसावळ शहरातील नसरवांजी फाईल भागातील सैलानी बाबा दर्गा जवळील रहिवाशाच्या उघड्या घरातून चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार मोहम्मद शाहीद शेख शकील कुरेशी (25, नसरवंजी फाईल, सैलानी बाबा दर्ग्याजवळ) यांच्या फिर्यादीनुसार 13 ते 14 मार्चदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरातून 33 हजार 940 रुपये किंमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व डोरले, दहा हजारांची रोकड तसेच 35 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल मिळून 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. तपास हवालदार नेव्हील बाटली करीत आहे.