भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात

0

भुसावळ शहर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई

भुसावळ : शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागात एक संशयीत आरोपी गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीच्या अंग झडतीत 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. विनोद लक्ष्मण चावरीया (40, वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरुन कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साहील तडवी, संजय बडगुजर, सुनील सैंदाणे, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख आदींच्या पथकाने केली. जुबेर शेख यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरूद्ध यापूर्वीदेखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Copy