भुसावळ : तालुक्यातील शिंदी येथील बसस्थानक भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाकडून गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे पकडली होती. त्याच पध्दतीने भुसावळ तालुका पोलिसांनी चौकशी केली असता पुन्हा भुसावळ शहरातील शिवकॉलनी भुसावळ हायस्कुल जवळ एकास 20 हजार रूपये किंमीचे गावठी पिस्तुल हस्तगत केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक प्रकाश इंगळे, सहाय्यक फौजदार मनोहर देशमुख, दिलीप येवले, प्रकाश महाजन, सतीश हाळनोर, रमेश चौधरी, रविंद्र गायकवाड, गफरखाँ तडवी, मिलिंद सोनवणे यांचे पथकाने शिंदी येथील बसस्टॅण्ड चौकात निवृत्ती उर्फ शिवा हरि गायकवाड (रा. रामनगर ता.कन्नड, जि.औरंगाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याजवळ 25 हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तुल जमा केले.
तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
आरोपीने दिलेल्या माहिती वरून मुकेश प्रकाश भालेराव (रा.शिंदी, ता.भुसावळ) याने हे गावठी पिस्तुल दिले असल्याचे सांगितले. तसेच अजुन एक गावठी पिस्तुल असल्याने 14 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक भुसावळ निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सचिन खामगड, सहा.फौजदार सुरेश वैद्य, हे.कॉ. युनूस शेख, अजय माळी, होमगार्ड अफसर सैय्यद यांनी गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आरोपी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (वय 23, रा. शिवकॉलनी, भुसावळ हायस्कुल जवळ) यांचेकडून गावठी पिस्तुल हस्तगत केले आहे. त्याचे विरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.